• February 20, 2025
  • No Comment

बाणेरमध्ये बांधकाम मजुराचा गळफास देऊन निघृण खून, आरोपी गजाआड

बाणेरमध्ये बांधकाम मजुराचा गळफास देऊन निघृण खून, आरोपी गजाआड

    पुणे: बाणेरमध्ये बांधकाम मजुराचा गळफास देऊन निघृण खून करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी (दि. १८) उघडकीस आला.

    यासंदर्भात दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुनील टुडू (वय ३२, रा.बनकी जोर, झारखंड, सध्या रा. लेबर कॅम्प, बाणेर) हे मृताचे नाव आहे.

    दारूच्या नशेत अथवा वैयक्तिक संबंधांच्या वादातून हा प्रकार घडला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. बाणेरमधील पॅनकार्ड क्लबच्या परिसरात एका तरुणाला गळफास देऊन लटकवण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला.

    नागरिकांनी या घटनेची माहिती दिल्यावर चतुःशृंगी पोलीस ठाण्याचे अधिकारी पथकासमवेत घटनास्थळी पोहचले. त्यांनी टुडू याला फासावरून काढून ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच तो मरण पावला असल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळले. यासंदर्भात पोलिसांनी तपास केल्यावर टुडू याचा ठावठिकाणा व वैयक्तिक माहिती पुढे आली. तो इमारतीच्या बांधकामावर मजुरी काम करायचा. तेथील दोघा मजुरांसमवेत तो रात्री गप्पा मारत होता. त्यांनी त्याला मारहाण करून गळफास दिल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली. त्यानुसार दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

    चतुःशृंगी पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *