• February 26, 2025
  • No Comment

शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थीनीशी गैरवर्तन करीत विनयभंग शिक्षकावर पोस्कोचा गुन्हा दाखल

शिक्षकांकडून अल्पवयीन  विद्यार्थीनीशी गैरवर्तन करीत विनयभंग शिक्षकावर पोस्कोचा गुन्हा दाखल

    शिरूर – तालुक्यातील कोळगाव डोळस येथे शिक्षकानेच चौथीत शिकत असलेल्या अल्पवयीन एका विद्यार्थीनीशी गैरवर्तन करीत विनयभंग केला आहे. सा संशयित शिक्षकावर पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ही घटना येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शनिवार (दि.२२) रोजी घडली आहे. याबाबत मुलीच्या पालकांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बाळासाहेब धोंडीबा गुंजाळ (वय ४५, ता.शिरूर) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नव आहे.

    शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळगाव डोळस येथील शाळेत शिक्षक बाळासाहेब धोंडीबा गुंजाळ हा अध्यापनाचे काम करीत आहे. तो चौथीत शिकणाऱ्या मुलींना वर्ग झाडून काढण्यास तसेच इतर कामे सांगत असे. मुली वर्ग झडताना तो त्यांच्याशी गैरकृत्य करीत होता. असे प्रकार त्याने अनेक वेळा केला आहे. तो मुलीला पट्ट्याने मारण्याची व जीवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे सदर पीडित मुलगी शाळेत जाण्यास घाबरत होती. पालकांनी विश्वासात घेत विचारपूस केल्याने तीने सर्व प्रकार सांगितला आहे. यामुळे संतपत पालकांनी शाळेला टाळे ठोकत शिक्षकाला चोप दिला. तसेच गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली.

    शिक्षण विभागाने चौकशी समिती नेमली असुन चौकशी अंती निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे गट शिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी सांगितले. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *