• February 26, 2025
  • No Comment

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बसमधे बलात्कार

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बसमधे बलात्कार

    पुणे : फलटण येथे गावी जाणाऱ्या महिलेला शिवशाही बसमध्ये जाण्यास सांगून तिच्यावर बसमध्येच बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना स्वारगेट बसस्थानकातील एका शिवशाही बसमध्ये

    बुधवारी पहाटे साडेपाच वाजता घडली. पोलिसांनी आरोपीचे नाव निष्पन्न केले असून त्याचा शोध घेण्यास पोलिसांची ८ पथके रवाना झाली आहेत. दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५, अंदाजे, रा. शिक्रापूर) असे या नराधमाचे

    नाव आहे. त्याच्याविरुद्ध जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. याबाबत पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले की, एका २६ वर्षाची तरुणी आपल्या गावी फलटणला जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकावर आली. तिला एकाने

    फलटणला जाणारी गाडी इकडे लागत नाही तिकडे लागते, असे सांगितले. त्यावर या तरुणीने इकडेच फलाटावर लागते, असे सांगितले. त्यावर त्याने तिच्याशी गोड बोलून तिला मी १० वर्षे इथे आहे. तिकडे लागणारी बसच

    फलटणला जाते, असे सांगून तिला आडबाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले. बसमध्ये अंधार होता. तेव्हा त्याने तुम्ही दरवाजा उघडून आत जा, असे सांगितले. तेव्हा ही तरुणी बसमध्ये गेली. तेव्हा तिच्या मागोमाग

    तो आत आला. त्याने दरवाजा लावून घेत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर ही तरुणी फलटणला जाण्यास निघाली. अर्ध्या वाटेवरुन ती परत आली व तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात आप बिती सांगितली. या घटनेची

    माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी तातडीने तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. त्या आरोपी निष्पन्न झाला आहे. त्याच्यावर पुणे ग्रामीण पोलिसांमध्ये जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. पुणे पोलिसांची ८ पथके आरोपीचा शोध घेत आहेत, असे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले.

    Related post

    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची देणगी

    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची…

    भीमनगर येथील गो-हे खुर्द येथे समाज मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एक प्रेरणादायी घटना घडली आहे. स्थानिक उद्योजक मा. श्री. कालिदास (दादा)…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *