• February 26, 2025
  • No Comment

विद्यार्थ्यांचा वापर करून परकीय चलन तस्करी करणार्‍यां दोघांना अटक

विद्यार्थ्यांचा वापर करून परकीय चलन तस्करी करणार्‍यां दोघांना अटक

    पुणे – तस्करांनी दुबई ट्रिपसाठी निघालेल्या तीन विद्यार्थ्यांचा वापर करून ट्रॉली बॅगमध्ये लपवून ठेवलेले सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे परकीय चलन पुणे विमानतळाच्या सीमाशुल्क विभागाने जप्त केले. या प्रकरणी दोघांना अटक केली असून, त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,एका व्यक्तीने १७ फेब्रुवारी रोजी दुबई ट्रिपसाठी निघालेल्या स्पाइस जेटच्या विमानातून दोन ट्रॉली बॅगमध्ये परकीय चलन भारतातून तस्करी केल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्या प्रवाशांना परत बोलावून घेतले. त्यांच्या सामानाची कसून तपासणी केली. अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या सामानातून तीन कोटी ४७ लाख रुपये (सुमारे चार लाख अमेरिकन डॉलर्स) जप्त केले. चौकशीदरम्यान, विद्यार्थ्यांनी सीमाशुल्क अधिकाऱ्यांना सांगितले की, या बॅगा पुण्यातील ट्रॅव्हल एजंट खुशबू अग्रवाल यांनी दिल्या होत्या. खुशबू अग्रवाल हिने या तीन विद्यार्थ्यांना त्यांच्या दुबई ट्रिपसाठी पॅकेज दिले होते. पुण्याहून निघण्यापूर्वी शेवटच्या क्षणी तिने विद्यार्थ्यांना दोन बॅगा दिल्या. त्यामध्ये कार्यालयीन कागदपत्रे असून, ती दुबईच्या कार्यालयात तातडीने द्यावयाची असल्याचे सांगितले. चांगल्या हेतूने या विद्यार्थ्यांनी बॅगा घेऊन पुण्याहून निघून गेले. परंतु तस्करीची माहिती मिळताच सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी अधिकाराचा वापर करून त्या प्रवाशांना दुबईवरून परत बोलावून सामानाची झडती घेतली. या प्रकरणी पुणे विमानतळाच्या एअर इंटेलिजेंस युनिटच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅव्हल एजंट खुशबू अग्रवाल हिला अटक केली. तिने जबाबात या परकीय चलनाची मालकी स्वीकारली. तपासादरम्यान, शोध पथकाने परकीय चलन पुरविणाऱ्या महम्मद आमीर यालाही अटक केली. त्याच्या फर्मची झडती घेतली असता, विविध देशांचे ४५ लाख रुपयांचे परकीय चलन आढळले. पुणे, मुंबईच्या एअर इंटेलिजेंस आणि कस्टम्स अधिकाऱ्यांनी पुणे, अहमदाबाद  आणि मुंबई येथील १० ठिकाणी छापे टाकले. खुशबू अग्रवाल आणि आमीर यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघा आरोपींना सहा दिवसांची कोठडी ठेवण्याचे आदेश दिले. त्यानंतर न्यायालयाने २४ फेब्रुवारीला दोघा आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यांची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत असल्याची माहिती पुणे सीमाशुल्क विभागाकडून देण्यात आली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *