• March 1, 2025
  • No Comment

वाघोली येथील गांजा विक्री प्रकरणी फरार आरोपी जेरबंद,गुन्हे शाखा युनिट-६ ची उल्लेखनीय कामगिरी

वाघोली येथील गांजा विक्री प्रकरणी फरार आरोपी जेरबंद,गुन्हे शाखा युनिट-६ ची उल्लेखनीय कामगिरी

    वाघोली: वाघोली येथे गांजा विक्री प्रकरणी सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट-६ पथकाने अटक केली आहे.

    रिझवान इस्माईल शेख (वय 39) रा. गोरे वस्ती, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे. असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे.

    पोलीसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, दिनांक 27/02/2024 रोजी गुन्हे शाखा युनिट 6 चे अंमलदार युनिट हद्दीत फरार आरोपींचा शोध व गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना रमेश मेमाणे व नितीन धाडगे यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, वाघोली पोलीस स्टेशन गु र नं 38/2024 एनडीपीएस कलम 8 (क), 20 (ब), (ii)(अ)मधील फरार आरोपी रिझवान इस्माईल शेख, वाघोली येथे येणार आहे. सदर बातमीच्या अनुशंगाने स्टाफसह जावून मोठ्या शीताफीने गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने आरोपीस अटक केली. सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासा करता आरोपीस लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

    सदरची कामगिरी मा. निखिल पिंगळे पोलीस उपआयुक्त गुन्हे, सहा.पोलीस आयुक्त सो गुन्हे-2 मा. श्री राजेंद्र मुळीक या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक छगन कापसे, रमेश मेमाणे, नितीन धाडगे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे यांचे पथकाने केलेली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *