• March 1, 2025
  • No Comment

पुणे बलात्कारप्रकरणी आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्कादायक दावा, आरोपी आणि पीडितेमध्ये इतक्या रुपयांचा व्यवहार

पुणे बलात्कारप्रकरणी आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्कादायक दावा, आरोपी आणि पीडितेमध्ये इतक्या रुपयांचा व्यवहार

    पुणे: पुण्यात एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची मंगळवारी (२५ फेब्रुवारी) पहाटे खळबळजनक घटना घडली. पुण्यातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये असलेल्या शिवशाही एसटी बसमध्ये तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला.

    या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे अटक करण्यात आली असून त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दत्तात्रय गाडे हा 35 वर्षांचा असून तो शिरुरच्या गुनाट गावात राहतो. याच गावातून पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या मुसक्या आवळल्या.

    पुणे बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडेच्या परिचयातील एका वकिलाने धक्कादायक दावा केला आहे. आरोपी आणि पीडित महिनाभरापासून एकमेकांना ओळखायचे, असा दावा अॅड. सुमीत पोटे यांनी केला आहे. घटनेवेळी आरोपी आणि पीडितेमध्ये साडेसात हजारांचा पैशांचा व्यवहार झाला, असेही सुमीत पोटे यांनी सांगितले. मात्र या पैशांच्या व्यवहाराबाबत सुनावणीवेळी कोणताही उल्लेख झाला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

    आरोपी आणि त्या सदर तरुणीशी ३१ दिवसांपासून ओळख

    आरोपी आणि त्या सदर तरुणीशी ३१ दिवसांपासून ओळख आहे. जर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज नीट पाहिलं, तर ती तरुणी आरोपीच्या मागे मागे जात आहे. तसेच आरोपी तिला घेऊन जाताना कुठेही जबरदस्ती करत नाही. तसेच बसमधून उतरतानाही आधी आरोपी खाली येतो, त्यानंतर ती येते. त्यानंतर अवघ्या ५० मीटर अंतरावर स्वारगेट पोलीस स्टेशन असताना ती तिथे तक्रार करण्यासाठी तिथे गेली नाही. त्यानंतर ती स्वत:च्या गावाकडे गेली. यानंतर ती हडपसरमध्ये उतरली आणि तिने पुन्हा स्वारगेटमध्ये येत पोलिसात तक्रार दाखल केली”, असे अॅड. सुमीत पोटे यांनी सांगितले.

    आरोपीने साडेसात हजार रुपये रोख स्वरुपात दिले

    “त्या महिलेला मी साडेसात हजार रुपये रोख स्वरुपात दिले आहेत. त्यावरुन त्यांचे वाद झाले. यानंतर तो आरोपी निघून गेला आणि कुठेही जबरदस्ती केलेली नाही. त्याने तिला ऑनलाईन पैसे देतो, असे सांगितलं. तर तिने ऑनलाईन नको रोख हवे असं सांगितले. त्यामुळे त्याने रोख पैसे दिले. माझं आणि आरोपींचं युक्तीवादानंतर बोलणं झालं. त्यामुळे मी याबद्दल कोर्टाला काहीही सांगितलेले नाही”, अशीही माहिती अॅड. सुमीत पोटे यांनी दिली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *