• March 1, 2025
  • No Comment

गुंतवणूक करण्याचे सांगत कोट्यवधी रुपयांना घातला गंडा, दोन आरोपी गजाआड

गुंतवणूक करण्याचे सांगत कोट्यवधी रुपयांना घातला गंडा, दोन आरोपी गजाआड

    पिंपरी चिंचवड: व्हेंट्रॉस डॉट कॉम या वेबसाईटवर कोट्यावधी रुपये गुंतवणूक करण्यास लावून गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयाची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी तपास सुरु असताना फसवणूक करणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर गुन्हे पोलिसांनी अहमदाबाद आणि मीरा-भाईंदर इथे जाऊन बेड्या ठोकल्या आहेत.

    ऑनलाईन फसवणूक करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. तर काहीजणांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे सांगत चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. अशाच प्रकारे पिंपरी चिंचवड शहरातील अनेकांना व्हेन्ट्रॉस डॉट कॉम या वेबसाईटवर गुंतवणूक करण्यास लावून फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर सायबर पोलिसांनी तपास करण्यास सुरवात केली होती.

    पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी तपास करताना दोन जणांना अहमदाबाद व मीरा- भाईंदर येथून ताब्यात घेतले आहे. यात मितेश राजू भाई व्होरा (वय ३४) आणि केपीन अजित कुमार मेहता (वय ४१) अशी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आरोपीची नाव आहेत. या दोन्ही आरोपींनी मिळून म्युचल अकाउंट मधून गुंतवणूकदारांचे फसवणूक केलेले कोट्यावधी रुपये बाहेर काढले आहेत.

    दरम्यान फसवणूक झाल्याच्या गुन्ह्यात दोघेजण पोलिसांच्या ताब्यात सापडले असून फसवणूक करणाऱ्या आरोपींचे अजून काही साथीदार असल्याचा संशय सायबर पोलिसांना आहे. त्या दृष्टिकोनातून सायबर पोलीसांकडून दोघांची चौकशी करण्यात येत असून त्या अनुषंगाने पुढील तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *