• March 3, 2025
  • No Comment

बांधकाम व्यावसायिकास ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल

बांधकाम व्यावसायिकास ५० लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल

    वानवडी: फ्लेक्सवर सदनिका खरेदी करू नये, म्हणून बांधकामाबाबत खोटी माहिती पसरवली. तसेच, बांधकाम पूर्णत्वास नेण्यासाठी बांधकाम व्यावसायिकास ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    याबाबत जयप्रकाश जगन्नाथ गिरमे (वय ६७, रा. प्रभात रस्ता) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन सोमनाथ जांभूळकर (वय ४६, रा. भैरोबानाला, वानवडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून २०२४ ते ऑक्टोबर २०२४ दरम्यान घडला.

     

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची वानवडीत वडिलोपार्जित जमीन आहे. गिरमेबाग येथील त्यांच्या जागेवर विकसकाकडून महापालिकेच्या परवानगीनंतर विकसनाचे काम सुरू आहे. सचिन जांभूळकर हा जून २०२४ पासून बांधकामाच्या जागेबाबत गैरसमज निर्माण होईल, अशी माहिती प्रसारित करीत आहे. बांधकामातील सदनिका खरेदी न करण्याबाबत या जागेच्या मालकीबाबत फ्लेक्सद्वारे गैरसमज पसरवत आहे. त्यामुळे फिर्यादी यांचे व्यावसायिक नुकसान होत आहे.

    फिर्यादीच्या मिळकतीच्या बाजूची जमिनीवर वनीकरणासाठी परवानगी मिळाल्याचा पाटबंधारे विभागाच्या खडकवासला कार्यकारी अभियंत्याचा बनावट आदेश तयार केला. याआधारे मिळकतीत हक्क मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच, बांधकाम पूर्णत्वास न्यायचे असल्यास ५० लाख रुपये द्या, अशी धमकी देऊन खंडणी मागितली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

    पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यजित आदमाने करीत आहेत.

    Related post

    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची देणगी

    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची…

    भीमनगर येथील गो-हे खुर्द येथे समाज मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एक प्रेरणादायी घटना घडली आहे. स्थानिक उद्योजक मा. श्री. कालिदास (दादा)…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *