• March 3, 2025
  • No Comment

पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन जप्त, कंटेनरसह चालक ताब्यात

पुण्यात तब्बल 10 कोटींच लाल चंदन जप्त, कंटेनरसह चालक ताब्यात

    पुणे: पुणे पोलिसांनी चंदनतस्करीचा ट्रक पकडला असून आता या तस्करीच्या मास्टरमाईंड पर्यंत पोहोचण्यासाठी तपास सुरू आहे. कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूहून मुंबईच्या दिशेनं निघालेलं कंटेनर भरुन चंदन जप्त करण्यात आलं आहे. आता, या चंदनतस्कीरच्या सिंडीकेट मेंबरचा शोध सुरु झाला. याप्रकरणी पुण्यातील पोलिसांनी सध्या चालकासह एकाला ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून प्राथमिक चौकशी करण्यात येत आहे.

    पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. जेएनपीटीवरुन हे चंदन आंतरराष्ट्रीय बाजारात जाणार होतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तब्बल 10 ते 12 कोटी रुपयांचं हे चंदन असेल अशी प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी, पुण्यातील गुन्हे विभागाकडून चंदनाचं वजन केलं जातं आहे. त्यानंतरच हे चंदन किती आहे? आणि चंदनाची बाजारातील किंमत किती, व इतर बाबींचा उलगडा होईल. दरम्यान, हे चंदन लाल चंदन आहे की चंदनातील नेमका कुठला प्रकार आहे याबाबतही पोलिसांकडून तपास केला जात आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *