• March 3, 2025
  • No Comment

स्वारगेट बलात्कार प्रकरण; आरोपी दत्ता गाडेच्या भावाचा खळबळजनक दावा

स्वारगेट बलात्कार प्रकरण; आरोपी दत्ता गाडेच्या भावाचा खळबळजनक दावा

    पुणे: पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये तरूणीवर बलात्कार झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे याला ताब्यात घेतलंय. घटनेची सखोल चौकशी केली जातेय.

    माझे आई-वडिल आणि माझ्या भावाची बायको प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. गावकरी, नातेवाईक शेजारी आमच्यासोबत कोणताही संबंध ठेवण्यास तयार नाही.आमच्यावर बहिष्कार टाकण्यात आलाय. घडलेलं प्रकरण चुकीचं आहे. परंतु आमच्या भावावरील गुन्हा अद्याप सिद्ध झालेला नाहीये, असा दावा स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या भावाने केलाय. आमचा भाऊ काय करतो, याची काहीही कल्पना अगोदर नव्हती. आम्हाला गुन्हे दाखल झाल्यानंतर समजलंय, असं ते म्हणाले आहेत. घटनेनंतर दत्ता गाडे घरी आला होता, असं देखील दत्ता गाडेच्या भावाने स्पष्ट केलंय.

     

    तर दत्तात्रय गाडेच्या मामाचा मुलगा बोलताना म्हटला की, पाच-सहा गुन्ह्यांमध्ये मी स्वत: जामिनदार आहे. एका गुन्ह्यात त्याला पोलिसांनी उचललं. त्यानंतर तीन-चार गुन्हे त्याच्यावर नोंदविण्यात आलेत. एका गुन्ह्यात त्याची निर्दोष मुक्तता देखील झालेली आहे. या प्रकरणात आम्ही सोशल मीडियावर सीसीटीव्ही बघितलाय. ती लेडीज त्याला अगोदर घेवून बसमध्ये गेलीय. ती मुलगी सुशिक्षित आहे. तिचे कपडे फाटलेले नाही, तिने काहीही आरडाओरडा देखील केलेला नाही. तिने तीन तासानंतर मित्रांच्या मदतीने पोलीस केस दिलीय.

    दत्ता गाडेचं कुटुंब मागणी करत आहे की, प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर मीडियाने नाण्याची दुसरी बाजू सुद्धा दाखवावी. या घटनेमुळे गावातील लोकांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय. घटना घडल्यानंतर दत्ता गाडे घरी आला होता. परंतु तो काही बोलला नाही, असं देखील माध्यमांसमोर दत्ता गाडेच्या भावाने म्हटलं आहे.

    Related post

    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची देणगी

    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची…

    भीमनगर येथील गो-हे खुर्द येथे समाज मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एक प्रेरणादायी घटना घडली आहे. स्थानिक उद्योजक मा. श्री. कालिदास (दादा)…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *