• March 3, 2025
  • No Comment

धक्कादायक! वडिलांकडूनच 14 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

धक्कादायक! वडिलांकडूनच 14 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

    पुणे: वडिलांकडूनच 14 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. तर, दुसऱ्या घटनेत ममााच्या मुलासोबत फिरत असलेल्या तरुणीवर गँगरेप झाला आहे.

    बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातील नांदेड सिटी परिसरात घडली आहे. स्वतःच्या 14 वर्षे मुलीवर नराधम बाप 8 महिने लैंगिक अत्याचार करत होता, आई घराबाहेर गेल्यावर नराधम बाप मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता. याप्रकरणी पुण्यातील नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा झाला आहे. पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तर नराधम बापाला अटक करण्यात आली आहे. बाल हक्क समितीने हा प्रकार उघडकीस आणलाय त्यानुसार गुन्हा दाखल करत नराधम बापाला काल बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

    शिरुर: दुसरी घटना शिरुर तालुक्यात कारेगाव परिसरात घडली आहे. कोरेगाव परिसरात राहणारी तरुणी ती राहत असलेल्या इमारतीच्या परिसरात मामाच्या मुलासह फेरफट मारत होती. दारु पिऊन आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना चाकुचा धाक दाखवत लाथा बुक्क्यानी मारहाण केली. यांनतर आरोपींनी मामाच्या मुलाला संबधीत तरुणीवर बलात्कार करण्यास सांगितले. आरोपींनी याचा व्हिडिओ बनवला. यानंतर दोंन्ही आरोपींनी देखील तरुणीवर बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर आरोपींनी तरुणीच्या अंगावरील सोनं काढुन घेतल. या प्रकरणी रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल जाला आहे.

    रांजणगाव पोलिसांनी तात्काळ त्या दोन नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अमोल नारायण पोटे (वय 25) आणि किशोर रामभाऊ काळे (वय 29) अशी अटक केलेल्या दोन आरोपीची नावे आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *