• March 3, 2025
  • No Comment

मार्केटयार्ड येथील कुख्यात गुंड स्थानबद्ध, एक वर्षासाठी वर्धा कारागृहात स्थानबद्ध

मार्केटयार्ड येथील कुख्यात गुंड स्थानबद्ध, एक वर्षासाठी वर्धा कारागृहात स्थानबद्ध

    पुणे: मार्केटयार्ड परिसरात दहशत माजविणार्‍या कुख्यात गुंडाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.

    फहीम फिरोज खान (वय २०, रा. गल्ली नंबर १९, आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) असे या गुंडाचे नाव आहे. फहीम खान याच्यावर शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत.

    मार्केटयार्ड परिसरात त्याची दहशत आहे. त्यामुळे त्याला तडीपार करण्यात आले होते. तडीपार असतानाही त्याने पुण्यात प्रवेश करुन ऑगस्ट २०२३ मध्ये आंबेडकरनगर येथे हातात कोयता घेऊन परिसरात दहशत माजवत होता. त्याचे गुन्हेगारी कृत्य थांबत नसल्याने मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी कट्टे, चेतन मोरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील भापकर, पोलीस अंमलदार अमरनाथ लोणकर, समीर चव्हाण, राजेश थोरात, कौस्तुभ जाधव, किरण जाधव, आशिष यादव, संदीप सूर्यवंशी यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रस्तावाची छाननी केली. फहीम खान याला एक वर्षासाठी वर्धा कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला.

    पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *