• March 4, 2025
  • No Comment

दोन करोड रुपयांसाठी पुणे शहरातून एका हिरे व्यापाऱ्याचे अपहरण

दोन करोड रुपयांसाठी पुणे शहरातून एका हिरे व्यापाऱ्याचे अपहरण

    पुणे: दोन करोड रुपयांसाठी पुणे शहरातून एका हिरे व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आले. बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. तिथल जितेंद्र शहा (वय ३५, रा. मुद्रा सोसायटी पुणे सातारा रोड बिबवेवाडी) असे अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अपहरण झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिथल शहा हे हिऱ्याचे व्यापारी आहेत. हिरे घेऊन त्यापासून दागिने तयार करण्याचे काम करतात. सोमवारी सायंकाळी शहा पती-पत्नी मुलीला शाळेतून आणण्यासाठी सॅलिस्बरी पार्क परिसरात गेले होते. शाळेतून घेतल्यानंतर तिथल शहा यांनी मुलाला पत्नीच्या ताब्यात सोपवले आणि काही कामानिमित्त कॅम्पात जात असल्याचे सांगून निघून गेले.

    दरम्यान सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या मोबाईलवर तिथल शहा यांच्या मोबाईल वरून फोन आला. समोरून बोलणाऱ्या अनोळखी व्यक्तीने “मैने आपके पति को उठाया है, दो करोड तयार रखो, आपके ससुर जी को बोलो, दो घंटे मे फोन करेंगे” असे म्हणत ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या फिर्यादीच्या पतीने तातडीने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस आयुक्त मनोज कुमार पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, निखिल पिंगळे, विवेक मासाळ यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

    तपासा दरम्यान तिथल शहा यांचे शेवटचे लोकेशन नवले पूल परिसरात आढळून आले आहे. याशिवाय तिथं शहा हे वापरत असलेली दुचाकी देखील त्याच परिसरात आढळली आहे. त्यानुसार पोलीस आता त्या घटनेचा तपास करत आहेत. तर दुसरीकडे हिरे व्यापारी असलेले तिथल शहा मागील काही दिवसांपासून आर्थिक संकटात असल्याची ही माहिती समोर आली आहे. याशिवाय जास्तीचा परतावा देतो असे सांगून त्यांनी अनेकांकडून पैसे घेतल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या अपहरण प्रकरणामागे आणखी दुसरी काही बाजू आहे का याचा देखील तपास पुणे पोलीस घेत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *