• March 4, 2025
  • No Comment

पुण्यातल्या शिरुर तालुक्यातील एका गावात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार दोघांना पोलिसांनी केली अटक

पुण्यातल्या शिरुर तालुक्यातील एका गावात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार दोघांना पोलिसांनी केली अटक

    पुण्यातल्या शिरुर तालुक्यातील एका गावात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे पोलिसांनी सोमवारी या घटनेबाबत माहिती दिली आहे. १ मार्चला चाकूचा धाक दाखवून या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी अमोल पोटे, श्रीगोंदा आणि किशोर काळे बीड या दोघांना अटक केली आहे

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी किशोर काळे हा ड्रायव्हर म्हणून काम करतो तर अमोल पोटे हा आरोपी मजूर म्हणून काम करतो. या दोघांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने या दोघांनीही सात मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १९ वर्षांची तरुणी मध्य प्रदेशातून तिच्या नातेवाईकांकडे पुण्यातल्या शिरुरमध्ये आली होती. रात्री ११ च्या सुमारास या तरुणीला काळे आणि पोटे या दोघांनी गाठलं. हे दोघंही त्यावेळी दुचाकीवरुन येत होते. यावेळी या दोघांनी पीडितेला चाकूचा धाक दाखवला आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. एवढंच नाही तर तिचा जो नातलग तिच्याबरोबर उभा होता त्या दोघांचे आक्षेपार्ह अवस्थेतले फोटो आणि व्हिडीओ या दोघांनी काढले. त्या दोघांना तसं करण्यास या दोन्ही आरोपींनी भाग पाडलं होतं. कुणाला बोलशील तर तुला ठार करु अशीही धमकी या दोघांनी सदर मुलीला दिली होती. तसंच तुझ्या नातलगाला आम्ही ठार करु अशीही धमकी दिली. तिच्या अंगावर असलेले सोन्याचे दागिने आणि तिच्याकडे असलेले पैसे घेऊन या दोघांनी पळ काढला

    पोलिसांना जेव्हा सदर घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख यांनीही या ठिकाणी भेट दिली आणि काय गुन्हा घडला याची सविस्तर माहिती घेतली. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. या प्रकरणात २ मार्चला FIR दाखल करण्यात आला अशीही माहिती समोर आली आहे. पीडित मुलगी तिच्या नातलगाशी बोलत उभी होती त्यावेळी दोघे जण आले आणि त्यांनी या दोघांनाही चाकूचा धाक दाखवला आणि पीडितेवर बलात्कार केला. तसंच तिच्या नातलगाला जीवे मारण्याची धमकी दिली. पुण्यातल्या स्वारगेट सारख्या ठिकाणी एक घटना घडलेली असताना आता पुण्यातल्या शिरुर तालुक्यातही अशीच घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांनाही अटक केली आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *