• March 4, 2025
  • No Comment

पोलिस अधिकाऱ्यांवर कोयत्याने वार करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पोलिस अधिकाऱ्यांवर कोयत्याने वार करणाऱ्याच्या  पोलिसांनी आवळल्या मुसक्या

    पिपंरी : खेड तालुक्यातील केंदूर घाटात दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दरोडेखोरांनी हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार API प्रसन्न जराड हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ही घटना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केंदूर घाटात मध्यरात्री घडली. डॉ. शिवाजी पवार यांच्या छातीवर, पाठीवर कोयत्याचा वार लागला असून प्रसन्न जराड यांच्या दंडावर जखम झाली आहे. यावेळी पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दरोडेखोरांवर दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एका दरोडेखोराच्या पायाला एक गोळी लागली आहे. सचिन चंदर भोसले याच्या पायाला गोळी लागली आहे. पोलिसांनी सचिन आणि त्याचा भाऊ मिथुन चंदर भोसले यांना पकडले आहे. सचिन भोसले याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी ९ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बहुळ येथे काही दिवसांपूर्वी एका वृद्ध दाम्पत्याच्या घरात शिरुन सहा दरोडेखोरांनी चाकू आणि सुरीचा धाक दाखवून लुटमार केली होती. त्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटुन नेली होती. या प्रकरणातील दरोडेखोर हे चिंचोशी गावात आणखी एक दरोडा

    टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या दोन पथकांनी केंदूर घाटात सापळा लावला होता. दरोडेखोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना झडप घालून पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दरोडेखोरांनी आपल्याकडील कोयत्याने डॉ. शिवाजी पवार व प्रसन्न जराड यांच्यावर हल्ला केला. कोयत्याचा वार लागून दोघेही जखमी झाले. डॉ. शिवाजी पवार यांनी केलेल्या गोळीबार सचिन भोसले हा जखमी झाला.अन्य पोलिसांनी मिळुन भोसले याला पकडले. त्यांचा एका साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *