• March 4, 2025
  • No Comment

स्वत:चे मोबाईलवरील स्कॅनर ग्राहकांना देऊन दीड लाखांना घातला गंडा, पेट्रोल पंपावरील कामगार फरार

स्वत:चे मोबाईलवरील स्कॅनर ग्राहकांना देऊन दीड लाखांना घातला गंडा, पेट्रोल पंपावरील कामगार फरार

    पुणे: पेट्रोल पंपावरील गॅस स्टेशनवर येणार्‍या वाहनचालकांना स्वत:चा स्कॅनर देऊन तसेच लॉकरमधील रोख रक्कम काढून घेऊन पेट्रोल पंपावरील कामगार दीड लाखांचा अपहार करुन फरारी झाला आहे.

    याबाबत संदिप आनंदा हांडे (वय ३३,रा. वानवडी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी ऋषिकेश गहाळे (वय २६, रा. पारी कंपनी चौक, नर्‍हे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार धायरी रोडवरील युवांश गॅस स्टेशन येथे २७ फेब्रुवारी दुपारी २ ते रात्री १० या वेळेत घडला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदिप हांडे हे मॅनेजर असून त्यांच्या कार्यालयात दोन लॉकर आहेत. तीन शिफ्टमध्ये तेथे काम चालते. कामगार एका लॉकरमध्ये शिफ्टनुसार पैसे ठेवतात. २७ फेब्रुवारी रोजी त्यांनी लॉकरमध्ये पैसे ठेवले होते. २८ फेब्रुवारीला लॉकर उघडला तर त्यात दुसर्‍या कामगारांच्या हिशोबातील २६ हजार रुपये नव्हते. सेंकड शिफ्टमधील कामगार ऋषिकेश गहाळे याला फोन केल्यावर त्याचा मोबाईल बंद लागला. त्यानंतर त्यांनी तपासणी केली. त्यात ऋषिकेश गहाळे याने दुसर्‍या शिफ्टमध्ये दुपारी २ ते रात्री १० पर्यंत गॅस विक्री केलेली ऑनलाईन वर न घेता स्वत:चे फोनवरील स्कॅनर वर घेतलेली असल्याचे लक्षात आले. असे एकूण १ लाख ५२ हजार ९३८ रुपये घेऊन तो पळून गेला आहे.  पोलीस हवालदार प्रकाश पाटील तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *