- March 4, 2025
- No Comment
व्यवसाया बरोबर सामाजिक भान ठेवत डाॅ.एली ऑरगॅनिक्स कडुन पुणे कँम्प परिसरात स्वच्छता

पुणे: डाॅ. एली ऑरगॅनिक्स ही एक नामांकित ऑरगॅनिक प्रोडक्ट्स (केस आणि त्वचेची काळजी घेणारी उत्पादने) बनवणारी भारतीय कंपनी आहे. यापूर्वी ही कंपनीकडून अनेक समाज उपयोग कार्यक्रम राबवण्यात आले आहे त्यात वृक्षारोपण करणे, अनाथ, वृद्धाश्रमात मुलांची सेवा अर्थात केस कापणे, नखें कापणे,शारीरिक निगा राखण्यासारखी सेवा करणे. यासारखे उपक्रम वेळोवेळी राबवले जातात. कंपनीमधील तब्बल चाळीस ते पंचेचाळीस कर्मचाऱ्यांकडून पुणे कँम्प परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे कंपनीच्या मालक डाॅ.एली यांनी सहभाग नुसता नोंदवला नाही तर स्वतः साफसफाईचे काम केले.

कॅम्प परिसरात रस्त्या लगतचा पुर्ण कचरा (प्लास्टीक पिशव्या, प्लास्टीक बॉटल्स, अजुनही सांड कचरा) हा स्वच्छ करण्यात आला.परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होत आहे.
या कंपनीतील कर्मचार्यांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला आहे की रोज कमीत कमी कचरा करणार, आणि शक्य होईल तेवढी साफसफाई करणार जेणे करुन पुढच्या सहा महिन्यात पुणे स्वच्छ होण्यात थोडा तरी हातभार लागेल.अशी विचारधारा ठेऊन जर प्रत्येक सुजाण नागरिकाने असा विचार केला तर लवकरच स्वच्छ पुणे, सुंदर पुण्याचं स्वप्न सत्यात उतरेल.




