• March 5, 2025
  • No Comment

इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनीला लागली भीषण आग;आगीत वाहनांचे सुटे भाग, बॅटरी, जळून खाक

इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनीला लागली भीषण आग;आगीत वाहनांचे सुटे भाग, बॅटरी, जळून खाक

    पुणे: कात्रज भागात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या एका कंपनीत मंगळवारी दुपारी आग लागली. कंपनीतील साहित्याने पेट घेतल्यानंतर आग भडकली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग तासाभरानंतर आग आटोक्यात आणली.

    कात्रज-गुजरवाडी रस्त्यावरील साई इंडस्ट्रिअल इस्टेट परिसरात इलेक्ट्रिक दुचाकी निर्मिती करणारी कंपनी आहे. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास कंपनीत आग लागली. आग लागल्यानंतर कंपनीतील कामगार बाहेर पळाल्याने अनर्थ टळला. कंपनीतील सााहित्याने पेट घेतल्यानंतर आग भडकली.

    या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सहा बंब आणि टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कात्रज केंद्रातील अधिकारी प्रदीप खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करुन तासाभरानंतर आग आटोक्यात आणली. आगीमागचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. आगीत कंपनीतील वाहनांचे सुटे भाग, बॅटरी,तसेच अन्य साहित्य जळाले.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *