• March 6, 2025
  • No Comment

मोक्का गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेला आरोपी गजाआड, लोणी काळभोर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

मोक्का गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेला आरोपी गजाआड, लोणी काळभोर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

    लोणी काळभोर: माथाडी बोर्डाचे नेते असल्याची बतावणी करुन गोदामातील प्रत्येक गाडीमागे १५ हजार रुपयांची खंडणीची मागणी केल्याची घटना घडली होती. ही घटना उरुळी देवाची (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील शेल पेट्रोल पंपाजवळ 12 जानेवारी 2024 ला घडली होती.

    या गुन्ह्यातील आरोपींवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोक्काची कारवाई केली होती. या गुन्ह्यातील एक आरोपी तब्बल 1 वर्षापासून चकवा देत होता. अखेर लोणी काळभोर पोलिसांनी फरार झालेल्या गुन्हेगाराला अटक केली आहे.

    युवराज बापू गुंड (वय-27, रा. उरुळी देवाची, ता. हवेली) असे करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. या अगोदर पोलिसांनी अण्णा उर्फ संतोष किसन देवकर (वय – 34, रा. अक्वा मॅजेस्टिक सोसायटी, फुरसुंगी), शेखर अनिल मोडक (वय 29, रा. वडकी गावठाण), साहस विश्वास पोळ (वय 25, रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, वडकी, ता. हवेली) व ऋषिकेश किसन खोड (वय-24, काळूबाई मंदिराजवळ, सासवड रोड, उरुळी देवाची) यांना बेड्या ठोकल्या होत्या. याप्रकरणी एका व्यावसायिकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

     

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या उरुळी देवाची येथील एका गोडावुन मध्ये वेगवेगळी अन्नधान्य येत असतात. तर दुसऱ्या गोडावुन मध्ये इलेक्ट्रीक साहित्य येत असते. गोडावुन मध्ये येणारे सामान उतरण्यासाठी काही पगार देवुन काही मजुर ठेवलेले आहेत. दरम्यान, एके दिवशी माथाडी नेते आण्णा देवकर व त्यांचे सहकारी त्या ठिकाणी आले. आरोपींनी गोडावुनमध्ये येणारा माल हा आमचे माथाडी कामगार खाली करणार दुसरे कोणाला माल उतरु देणार नाही. अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. तसेच काम बंद करायचे नसेल तर गोदामातील प्रत्येक गाडीमागे १५ हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     

    दरम्यान, टोळी प्रमुख संतोष उर्फ आण्णा देवकर हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार करुन हिंसाचाराचा वापर केला. तसेच हिंसाचार करण्याची धमकी देऊन, धाक दडपशाही करून, जबरदस्तीने तसेच बेकायदेशीर कृत्य करत होता. या टोळीने मागील 10 वर्षात खुन, खुनाचा प्रयत्न, अपहरण, बेकायदेशीर जमाव जमवणे, हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे असे गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे. आरोपींवर कायद्याचा वचक बसावा म्हणून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 च्या कलमान्वये मोकाची कारवाई केली आहे.

     

    त्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी या गुन्ह्यातील चार आरोपींना तत्काळ अटक केली होती. तर आरोपी युवराज गुंड हा कारवाई झाल्यापासून फरार झाला होता. मात्र लोणी काळभोर पोलिसांच्या पथक आरोपीचा शोध घेत होते. पोलिसांना गुंड हा उरुळी देवाची येथे येणार असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून आरोपीला मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.

    सदरची कामगिरी हडपसर परिमंडळ पाच च्या सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस अंमलदार मल्हारी ढमढेरे, सोमनाथ गळाकाटे व त्यांच्या पथकाने केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *