• March 6, 2025
  • No Comment

वाल्मिक कराडचे आणखी कारनामे समोर, CID च्या चार्जशीटमध्ये मोठे खुलासे

वाल्मिक कराडचे आणखी कारनामे समोर, CID च्या चार्जशीटमध्ये मोठे खुलासे

    बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने अर्थात सीआयडीने चार्जशीटमध्ये मोठे खुलासे केला आहे.

    यामुळे हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी आणि हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड याचे पाय आणखी खोलात गेले आहेत. सीआयडीने कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. सीआयडीने आपोपमध्ये आका अर्थात वाल्मिक कराडबाबत मोठे खुलासे केले आहेत. वाल्मिक कराडच्या कारनाम्याचा कच्चाचिठ्ठाच उघडला आहे.

    वाल्मिक कराड याला बीड जिल्ह्यात आपला दबदबा कायम ठेवायचा होता. म्हणूनच त्याने विविध विकास प्रकल्पांमधून पैसे मिळवण्यासाठी बीड जिल्ह्यात अनेक गँग्स तयार केल्या होत्या, असे आरोपपत्रात म्हटले आहे. याबाबत सीआयडीने अनेक पुरावे देखील कोर्टात सादर केले आहेत.

    संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे. तपास अधिकाऱ्यांनी गोपनिय पाच साक्षीदारांच्या हवालेने वाल्मिक कराडसह इतर आरोपींच्या विरोधात कोर्टात आरोपपत्र सादर केले आहे. खंडणी मिळाली नाही तर वाल्मिक कराड याला प्रचंड संताप येत होता. तो आधी पीडितांचे अपहरण करायचा आणि नंतर त्यांचा अमानूष छळ करत होता. सीआयडीने आरोपपत्रामध्ये एका खंडणी प्रकरणाचा देखील उल्लेख केला आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

     

    सरपंच संतोष देशमुख यांची अमानूष छळ करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. मारेकऱ्यांनी या घटनेचे तब्बल 15 व्हिडिओ बनवले होते. आठ फोटो काढण्यासोबतच दोन व्हिडिओ कॉल्स देखील केले होते. हे व्हिडिओ महेश केदार नावाच्या एका आरोपीच्या स्मार्टफोनवरून शूट करण्यात आल्याचे एका तपास अधिकाऱ्यांने सांगितले. हे सर्वकाही सीआयडीने आरोपपत्रात नमूद केले आहे.

    संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांना आणखी एक महत्त्वाचा पुरावा मिळाला आहे. संतोष देशमुख यांची हत्या करण्याआधी त्यांचा खूप छळ करण्यात आला होता. मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांचा केलेला छळ लाईव्ह व्हिडिओद्वारे मोकारपंती ग्रुपवर दाखवला होता. आरोपींनी 4 वेळा व्हिडिओ कॉल केल्याची माहिती मिळाली आहे. मोकारपंती ग्रुपवर व्हिडिओ कॉल करणारा आरोपी कृष्णा आंधळे असून तो सध्या फरार आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *