• March 7, 2025
  • No Comment

बेदम मारहाण करून भोसरीत तरुणाचा खून चोर समजून मारहाण ; दोन आरोपी गजाआड

बेदम मारहाण करून भोसरीत तरुणाचा खून चोर समजून मारहाण ; दोन आरोपी गजाआड

    पिंपरी: चोर समजून बेदम मारहाण केलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

    विकास देविदास माने (वय ३५, रा.फिरस्ता, मूळ – वडगाव हरी, ता. चाकूर, जि. लातूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे तर शुभम शिंदे (वय २०) व आकाश गायकवाड (वय २५, दोघेही रा. देवकर वस्ती, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

    वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास माने हे भंगार गोळा करून रस्त्यावर कुठेही रहायचे. दरम्यान, बुधवारी सकाळी देवकर वस्ती येथे विकास माने हे आरोपींना दिसले असता, त्यांनी विकास यांना चोर समजून एका खांबाला दोरीने बांधले. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी याबाबत पोलिसांनी कल्पना दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी विकास यांना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

    त्यामुळे याप्रकरणी पोलसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता १० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *