• March 7, 2025
  • No Comment

गजा मारणे प्रकरण: अभियंता तरुणास मारहाण, आरोपीविरुद्ध मोक्का कारवाई

गजा मारणे प्रकरण: अभियंता तरुणास मारहाण, आरोपीविरुद्ध मोक्का कारवाई

    पुणे: अभियंता तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गुंड गजानन मारणे टोळीतील सदस्यांची फिर्यादी तरुणाच्या उपस्थित ओळख परेड करण्यात आली आहे. मात्र पोलिस कोठडीत असलेले आरोपी कोणतीही माहिती देत असून, उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात दिली.

    तरुणाला कोथरूड परिसरातील भेलकेनगर येथे १९ फेब्रुवारीला रात्री मारणे टोळीतील काही सराईतांनी बेदम मारहाण केली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी गुंड गजानन पंढरीनाथ मारणे (वय ५८) याच्यासह रूपेश कृष्णराव मारणे, ओमतिर्थ राम धर्म जिज्ञासू (वय ३५), किरण कोंडिबा पडवळ (वय ३१), अमोल विनायक तापकीर (वय ३५. सर्व रा. शास्त्रीनगर, कोथरूड) आणि बाब्या ऊर्फ श्रीकांत संभाजी पवार (रा. वडगाव रासाई, शिरूर) या सहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली. यातील रूपेश मारणे आणि बाब्या पवार या आरोपींचा पोलिस अद्याप शोध घेत आहेत.

    पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने, पडवळ आणि तापकीर यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील विलास पठारे यांनी केला. आरोपींच्या वतीने ॲड. विजयसिंग ठोंबरे यांनी बाजू मांडली. विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी तीनही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *