• March 7, 2025
  • No Comment

पुणे ग्रामीण जिल्ह्यात २१ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, कोणकोणत्या गोष्टींना मनाई? पहा सविस्तर

पुणे ग्रामीण जिल्ह्यात २१ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश, कोणकोणत्या गोष्टींना मनाई? पहा सविस्तर

    पुणे: कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं पुणे ग्रामीण जिल्हा प्रशासनानं महत्वाचं पाऊल उचललं आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यात ८ मार्च रोजी मध्यरात्री १२ वाजून ५ मिनिटांपासून ते २१ मार्च रात्री १२ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

    महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७ (१) अन्वये अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी हे आदेश दिले आहेत.

    कोणकोणत्या गोष्टींवर प्रतिबंध

    स्फोटक किंवा ज्वलनशील द्रव पदार्थ बाळगण्यास मनाई आहे. शस्त्रे, हत्यारे, अस्त्रे, दगड आदी सोबत नेणे, भाले, तलवार, काठ्या, दंड, बंदूक किंवा शरीराला हानी पोहचवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू सोबत बाळगण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा राजकीय पक्षाच्या नेत्यांचे फोटो प्रदर्शन किंवा ते जाळणे, मोठमोठ्याने अर्वाच्च भाषेत घोषणाबाजी देणे; तसेच वाद्ये वाजवण्यास मनाई करण्यात आली आहे.

    राज्याच्या सुरक्षिततेला धोका पोहोचेल, सभ्यता आणि नितिमत्तेला धोका पोहोचेल किंवा राज्य उलथवून लावण्यास चिथावणी देणारी आवेशपूर्ण आणि द्वेषपूर्ण भाषणे, अविर्भाव, कोणत्याही प्रकारचे जिन्नस तयार करून त्याद्वारे लोकांमध्ये त्याचा प्रसार करणे, कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल अशी वर्तवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

    कलम ३७ (३) अंतर्गत पाचपेक्षा अधिक लोक एकत्रित येणे, याशिवाय पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या पूर्वपरवानगीशिवाय सभा किंवा मिरवणुकीचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे.

    महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ३७ (१) अन्वये अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी नमूद केल्यानुसार, या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. जे या आदेशाचे उल्लंघन करतील ते महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १३५ नुसार शिक्षेस पात्र होतील.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *