• March 7, 2025
  • No Comment

धक्कादायक! सात प्रकारची हाडे अन् कवटी, पुणे शहरात मानवी सांगाडा आढळल्याने खळबळ

धक्कादायक! सात प्रकारची हाडे अन् कवटी, पुणे शहरात मानवी सांगाडा आढळल्याने खळबळ

    पुणे: पुण्यातील येरवडा येथील खुळेवाडीतील एलआयसी मोकळ्या मैदानावर मानवी हाडांचा सापळा आणि कवटी आढळल्याने खळबळ उडाली आहे. विमानतळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर तिथे मोबाइल आणि आधार कार्ड सापडले.

    ससून रुग्णालयाच्या माहितीनंतर या हाडांचा उलगडा होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

    लोहगावमधील खुळेवाडी मैदानावर एका व्यक्तीचा हाडांचा सापळा पडल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. विमानतळ पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर मानवी व्यक्तीची सात प्रकारची हाडे आणि कवटी दिसली. त्या ठिकाणी पोलिसांना मोबाइल फोन आणि ‘शिवकुमार के’ या नावाचं आधार कार्ड मिळालं. पोलिसांनी पंचनामा करून हाडे पुढील तपासासाठी ससून रुग्णालयात पाठवली आहेत. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, सहाय्यक आयुक्त प्रांजली सोनावणे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या आहेत.

     

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *