• March 8, 2025
  • No Comment

पुण्यात अपघात सत्र सुरूच, एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुण्यात अपघात सत्र सुरूच, एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

    पुणे: एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पर्वती पायथा परिसरात घडली. याप्रकरणी एसटी बसचालकावरिुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

    विजय गोपाळ गेजगे (रा.पर्वती पायथा) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत गेजगे यांचा मित्र आशिष मारुती भालेराव (वय ३४, रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एसटी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार गेजगे पर्वती पायथा परिसरातून मंगळवारी (४ मार्च) रात्री पावणेदहाच्या सुमारास निघाले होते. पर्वती पायथा परिसरात त्यांनी दुचाकी थांबविली. रस्त्याच्या कडेला ते दुचाकी लावत होते. दुचाकी लावताना त्यांचा अचानक तोल गेला आणि ते रस्त्यावर पडले. त्या वेळी पाठीमागून येणाऱ्या भरधाव एसटी बसचे चाक त्यांच्या दोन्ही पायांवरुन गेले.

    गंभीर जखमी झालेल्या गेजगे यांना तातडीने नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसंनी घटनास्थळी भेट दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता एसटी बसचालक पसार झाला. उपचारादरम्यान गेजगे यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक राहुल नामदे तपास करत आहेत.

    दुसरी घटना:

    वाहनाच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू

    हडपसर: हडपसर-सासवड रस्त्यावर वाहनाच्या धडकेत सायकलस्वार ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

    रवींद्र सिद्धप्पा माळगी (वय ६०, रा. वडकी) असे मृत्युमुखी पडलेल्या सायकलस्वाराचे नाव आहे. याबाबत माळगी यांचा पुतण्या रोहित विजय माळगी (वय ३२, रा. वाघोली, नगर रस्ता) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र माळगी हे ३ मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सासवड रस्त्याने निघाले होते. त्या वेळी भरधाव वाहनाने माळगी यांना धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या माळगी यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक कोमल जाधव तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *