• March 8, 2025
  • No Comment

पुण्यात पोलीस ठाण्यासमोर ‘बर्थ डे’सेलिब्रेशन करण पडल महागात, चार पोलिस निलंबित, वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली

पुण्यात पोलीस ठाण्यासमोर ‘बर्थ डे’सेलिब्रेशन करण पडल महागात, चार पोलिस निलंबित, वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली

    पुणे: पुणे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पुण्यातील सांगवी पोलीस स्टेशन मधील ४ पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले आहे. याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली केली आहे.सांगवी पोलीस ठाण्यासमोर ‘बर्थ डे’ सेलिब्रेशन करून रील व्हायरलं केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

    सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे. बर्थ डे बॉय पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांच्यासह पोलीस अंमलदार विवेक गायकवाड, सुहास डंगारे, विजय मोरे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

    मिळालेल्या महितीनुसार, बुधवार (५ मार्च ) संपताच रात्री १२ वाजता गुरुवार सुरू होण्याच्या वेळी सांगवीतील पोलिस ठाण्यातील कर्मचारी प्रवीण पाटील यांची मित्र मंडळी जमा झाली होती. त्यात पोलिस स्टेशनमधील इतर कर्मचारी आणि काही गुन्हेगारांचाही समावेश होता, असे प्रत्यक्षदर्शींचे मत होते. यावेळी सांगवी पोलीस स्टेशनच्या समोर मध्यरात्री बाराच्या ठोक्याला ‘दादा’ लिहलेला दुमजली केक कापण्यात आला. त्यावेळी इतरांच्या हातात फायर गन, स्काय शॉट होते. रस्त्यातच फटाक्यांची आतिषबाजी केली. आकाशात भुईनळ, या जल्लोषाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण केले. पुष्पा चित्रपटातील अब दिख रहा हूं ना मै जैसा दिखाना चाहिए वैसा. हरगीज झुकेगा नही साला … या डायलॉगवर रील केली आहे.आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले.

    मात्र, व्हिडीओ सर्वत्र पसरल्या नंतर सर्व सामान्य नागरिकांकडून टीका होत आहे. हे व्हिडिओ वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांपर्यंत पोहचले. त्यानंतर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी याची तातडीने दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांची पोलीस नियंत्रण कक्षाला बदली केली. तसेच बर्थ डे बॉय प्रवीण पाटील याच्यासह त्यात सहभागी झालेले पोलीस अंमलदार विवेक गायकवाड, सुहास डंगारे, विजय मोरे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *