• March 8, 2025
  • No Comment

पुण्यात कोयत्याने वार करुन तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; एक आरोपी अटक

पुण्यात कोयत्याने वार करुन तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; एक आरोपी अटक

    पुणे: पुर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार खडकीतील रेंजहिल्स भागात घडला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, साथीदार पसार झाले आहेत.

    रेहान मोहम्मद शेख (वय २२, रा. खडकी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अनिकेत काळे (रा. रेंजहिल्स झोपडपट्टी, खडकी) याला अटक करण्यात आली असून, त्याचाबरोबर असलेला साथीदार आकाश काळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रेहान शेख याने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख आणि काळे यांच्यात काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. मंगळवारी (५ मार्च) रात्री अकराच्या सुमारास शेख रेंजहिल्स परिसरातून निघाला होता. त्यावेळी आरोपींनी त्याला अडवून शिवीगाळ केली. त्याच्यावर कोयत्याने वार करुन आरोपी पसार झाले. गंभीर जखमी झालेल्या शेख याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी आरोपी अनिकेतला अटक केली असून, त्याच्याबारेबर असलेल्या साथीदाराचा शाेध धेण्यात येत आहे.

    पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे अधिक तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *