- March 8, 2025
- No Comment
गाड्यांची तोडफोड करणार्या टोळक्यांची काढली धिंड, भारती विद्यापीठ पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
पुणे: पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात दहा ते बारा गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली होती. पोलीस स्टेशनच्या आसपासच घटना घडल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खाकी वर्दीचा धाक गुन्हेगारांना राहिला नसल्याची टीकाही झाली.
गाड्यांच्या तोडफोडीची तक्रार भारती विद्यापीठ पोलिसांत दाखल होती. पोलिसांनी घटना घडल्यानंतर दोन दिवसांतच आरोपींना शोधले. त्यांना तत्काळ अटक करून त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कात्रज गुजरवाडी रोड येथील भारत नगर येथे लाईट नसल्याचा फायदा घेत अज्ञातांनी दहा ते बारा वाहनांची तोडफोड केली होती.
दहशत माजवण्यासाठी मंगलमूर्ती सहकारी गृह रचना मर्यादित सोसायटीत गाड्यांची तोडफोड केली होती. परिसरात आपली दहशत असावी, यासाठी आरोपींनी हे कृत्य केल्याचे पोलीस कोठडीत आरोपींनी सांगितले. त्यानंतर जिथे गुन्हे केला तिथेच आरोपींना घेऊन जात पोलिसांनी त्यांची धिंड काढली.