- March 15, 2025
- No Comment
महाबळेश्वहून परतत असताना पुण्यातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू, चालकाचे नियंत्रण सुटले
लोणी काळभोर: काल होळीच्या सणादिवशी पुण्यातील लोणी काळभोर येथील तरुणांच्या गाडीचा भीषण अपघाताची घटना महाबळेश्वर वाई रस्त्यावरील पसरणी घाटात घडली आहे. या भीषण अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे इतर दोन सहकारी गंभीररित्या जखमी झाले आहेत.
जखमींना वाईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातामध्ये मृत्यूमूखी पडलेल्या दोन तरुणांच्या घरांच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हा अपघात काल गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झाला. महाबळेश्वर वाई रस्त्यावरील पसरणी घाटात १०० मीटर दरीत कोसळून अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये अक्षय म्हस्कू काळभोर (वय २६ ), सौरभ जालिंदर काळभोर (वय २६) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर वैभव काळभोर, (वय २४ ) बजरंग पर्वतराव काळभोर (वय ३५, सर्व रा. रायवाडी, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी या अपघातामध्ये जखमी झालेल्यांची नावे आहेत.