- March 15, 2025
- No Comment
पुणे पुन्हा हादरलं! भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतच तरुणीवर बलात्कार
पुणे: पुण्यात पुन्हा एकदा बलात्काराची घटना घडली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतच तरुणीवर बलात्कार झाला आहे. परिचयाच्या व्यक्तीनेच बलात्कार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
ओळखीचा गैरफायदा घेत तरुणीवर बलात्कार केला. इतकच नव्हे तर तिला सोशल मीडियातून वारंवार धमकी दिली जात आहे. असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये आरोपी सिद्धांत रणधीर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीने तक्रार करुन वीस दिवस झाले आहेत. मात्र, अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही. पीडित तरुणीला आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून वारंवार धमकी देत आहे. तसेच तिच्या मोबाईल क्रमांकावर अश्लील फोटो सुद्धा आरोपीकडून पाठवण्यात आले. यावर पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला अटक केली जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.