• March 15, 2025
  • No Comment

जमीन बळकविल्याप्रकरणी पिरंगुटमधील एकावर गुन्हा दाखल

जमीन बळकविल्याप्रकरणी पिरंगुटमधील एकावर गुन्हा दाखल

    पुणे: कासार आंबोली (ता. मुळशी) येथील जमीन व घर बळकविल्याप्रकरणी एकावर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासार आंबोली येथील गट नं ५७६ ही जमिन मिळकत व त्यावरील घर मिळकत बळकविल्याप्रकरणी मनीष उत्तम गोळे (रा.पिरंगुट, ता. मुळशी) याच्यावर अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत, तसेच विविध फौजदारी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

    या प्रकरणी जमीन मालक आशिष संजीव केदारी यांनी पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या गुन्ह्यातील आरोपी मनीष गोळे हा फरारी झाला आहे. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पौड पोलिस करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *