• November 1, 2025
  • No Comment

पुणे कलवड वस्तीतील खेसे कॉर्नर येथे गुंडांनी तरुणावर वार करुन रिक्षांच्या काचा फोडून ५ दुचाकींचे केले नुकसान

पुणे कलवड वस्तीतील खेसे कॉर्नर येथे गुंडांनी तरुणावर वार करुन रिक्षांच्या काचा फोडून ५ दुचाकींचे केले नुकसान

    पुणे : आम्ही इथले भाई, असे म्हणून तिघा गुंडांनी दहशत निर्माण करण्यासाठी तरुणावर कोयत्याने वार करुन ३ रिक्षांच्या काचा फोडल्या. तेथे उभ्या असलेल्या ५ दुचाकी पाडून त्यांचे नुकसान केले. याबाबत विनय नरेश अगरवाल (३४, रा. नागपूर चाळ, येरवडा) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गणप्या (रा. कलवड वस्ती), जोशवा विल्सन रत्नम (रा. विकासनगर, कलवड वस्ती) आणि आयान शेख (रा. कलवड वस्ती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कलवड वस्तीतील खेसे कॉर्नर येथे बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनय अगरवाल हे त्यांचा भाऊ हर्ष याच्यासोबत दुचाकीवरून पेट्रोल भरण्यासाठी लोहगाव येथील साठे वस्तीतील पेट्रोल पंपावर जात होते. कलवड वस्ती येथील खेसे पार्क कॉर्नरवरील इस्टरलीया सोसायटीसमोर तीन मुले शिवीगाळ करुन धमकी देत त्यांच्या अंगावर आली. त्यांच्यातील गणप्या याने त्याच्याकडील कोयता विनय अगरवाल यांच्या हातावर मारून जखमी केले. आम्ही इथले भाई आहोत, आम्ही सगळ्यांना मारून टाकू असे ओरडत दहशत पसरवली. कलवड वस्ती येथे उभ्या केलेल्या तीन रिक्षांच्या काचा कोयत्याने फोडून टाकल्या. ५ दुचाकी खाली पाडून त्यांचे नुकसान करुन दहशत निर्माण केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शिंदे करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *