• November 1, 2025
  • No Comment

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील ३२ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला १ कोटी ७५ लाख ६ हजार ५८० रुपयांचा २८४ किलो अंमली पदार्थ पोलिसांनी केले नष्ट

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील ३२ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला १ कोटी ७५ लाख ६ हजार ५८० रुपयांचा २८४ किलो अंमली पदार्थ पोलिसांनी केले नष्ट

    पुणे : शहरपोलीस आयुक्तालयातील ३२ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला १ कोटी ७५ लाख ६ हजार ५८० रुपयांचा २८४ किलो अंमली पदार्थपोलिसांनी नष्ट केला आहे. रांजणगाव येथील एम ई पी एल कंपनीच्या भट्टीमध्ये हा सर्व अंमली पदार्थ नाश करण्यात आला आहे.

    पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील मुुद्देमाल नाश कमिटीचे अध्यक्ष अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, राजलक्ष्मी शिवणकर, सहायक रासायनिक विश्लेषक अ अ कामठे, प्रादेशिक न्यायवैद्कीय प्रयोगशाळेचे वैज्ञानिक सहायक आर आर पाटील, परिचार प्र म येलपुरे, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अजय खामकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक वसंत कौसडीकर, दुय्यम निरीक्षक रोहित माने यांच्या उपस्थितीत पोलीस आयुक्तालयातील ५ पोलीस ठाण्यांमधील अंमली पदार्थ त्यामध्ये गांजा, एम डी, कोकेन, हेरॉईन, एम डी एम ए, अफुची झाडे, मेथाम्फेटा माईन, बांटा गोळी, इडुलिस खत, चरस असे एकूण २८४ किलो अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहे.

    त्यात लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील २२ गुन्हे, खडक ६, डेक्कन २ आणि फरासखाना व कोथरुडमधील प्रत्येकी एक अशा ३२ गुन्ह्यांमधील जप्त अंमली पदार्थ होता. त्यात सर्वाधिक ४३ लाख, ५५ हजार ७६० रुपयांचा २१७ किलो गांजा, ५४ लाख ४६ हजार ८०० रुपयांचा ४ किलो ५३९ ग्रॅम चरस यांचा प्रामुख्याने समावेश होता.

    अपर पोलीस आयुक्त पंकज देखमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड, दत्ताराम जाधव, नितीन जाधव, नागेश राख, दयानंद तेलंगे, संदिप शिर्के, सुहास डोंगरे, विनायक साळवे, सर्जेराव सरगर, रेहाना शेख, सूर्यवंशी, रवी रोकडे, चेतन गायकवाड, कांबळे, मांढरे, जगदाळे, अक्षय शिर्के, दिनेश बास्टीवाड, सुहास तांबेकर, शेलार यांनी केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *