• November 1, 2025
  • No Comment

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकाजवळ18 वर्षीय तरुणीच्या शरीरावर अश्लाघ्य टिप्पणी रिक्षाचालकाकडून विनयभंग

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकाजवळ18 वर्षीय तरुणीच्या शरीरावर अश्लाघ्य टिप्पणी रिक्षाचालकाकडून विनयभंग

    पुणे: स्वारगेट परिसरात 18 वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी रिक्षाचालक सुरेश पारधे (वय 55) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो सध्या फरार आहे. घटना 29 ऑक्टोबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास स्वारगेट मेट्रो स्टेशनच्या परिसरात घडली.

    फिर्यादी तरुणी पायी जात असताना, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षाचालकाने तिच्याशी “कुठे जायचे आहे?” असा प्रश्न विचारला. ती दुर्लक्ष करून पुढे निघाली असताना त्याने अश्लील वाक्ये उच्चारून तिचा विनयभंग केला. घाबरलेल्या तरुणीने तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. स्वारगेट पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

    स्वारगेट हे पुण्यातील सर्वाधिक गर्दीचे आणि वाहतूकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असून, येथे दररोज हजारो विद्यार्थी, महिला प्रवासी आणि नोकरदार वर्ग प्रवास करतात. त्यामुळे अशा घटना घडणे चिंताजनक मानले जात आहे. दत्ता गाडे प्रकरणानंतर वाढवण्यात आलेल्या सुरक्षेच्या उपाययोजना कितपत प्रभावी आहेत, याबाबत पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *