- November 2, 2025
- No Comment
रास्ता पेठेतील सराईत गुन्हेगारांवर एम पी डी ए अंतर्गत कारवाई एक वर्षासाठी चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध
पुणे : विनयभंग केलेल्या तरुणीने तक्रार देऊ नये म्हणून तिच्या दुकानाला आग लावणाऱ्या रास्ता पेठेतील सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एम पी डी ए अंतर्गत कारवाई केली असून त्याला एक वर्षासाठी चंद्रपूर कारागृहात स्थानबद्ध केले आहे. लकी विलास इनरकर (वय 33, रा. रास्ता पेठ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
लकी इनरकर यांच्यावर मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच एका तरुणीचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणीने तक्रार देऊ नये म्हणून तिच्या दुकानाला त्याने आग लावली होती.
त्याच्या दहशतीमुळे कोणी तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी लकी इनरकर याला एम पी डी ए अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर केला होता. त्याची पोलीस आयुक्तांनी पडताळणी करून लकी इनरकर याला एक वर्षासाठी चंद्रपूर जिल्हा कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला.
त्यानुसार समर्थ पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चंद्रपूर कारागृहात नेण्यात आले. गेल्या सहा महिन्यात समर्थ पोलीस ठाण्यातील ४ सराईत गुन्हेगारांवर एम पी डी ए अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी सांगितले.