- November 9, 2025
- No Comment
पत्नीचा खुन करुन मृतदेह टाकला जाळून; वारजे माळवाडी पोलिसांनी पतीला केली अटक

पुणे : पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर वारजे माळवाडी पोलिसांनी केलेल्या तपासात पतीने दृश्यम ३ फिल्मी स्टाईलने पत्नीचा गळा दाबून खुन करुन तिचा मृतदेह जाळून तिची राख नदीपात्रात टाकून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. स्वत:चे अनैतिक संबंध असताना पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खुन केल्याचे उघडकीस आले आहे. वारजे माळवाडी पोलिसांनी
या पतीला अटक केली आहे. समीर पंजाबराव जाधव (वय ४२, रा. स्वामी संकुल अपार्टमेंट, शिवणे) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी पत्रकार परिषदेत माहिती
दिली. समीर जाधव हा त्याची पत्नी अंजली समीर जाधव (वय ३८) ही २६ ऑक्टोंबर २०२५ रोजी दुपारी वारजे पुलाजवळील वारजेकडून कात्रजकडे जाणाऱ्या रोडवरील बसस्टॉपजवळून बेपत्ता झाल्याची मिसिंगची तक्रार
२८ ऑक्टोंबर रोजी वारजे पोलीस ठाण्यात दिली होती. त्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन गायकवाड याच्याकडे देण्यात आला होता. समीर जाधव याला चौकशीकामी बोलावल्यावर त्याने त्याची पत्नी ही
शिंदेवाडी येथील श्रीराम मिसळ हाऊस, गोगलवाडी फाटा येथून बेपत्ता झाल्याचे सांगितले. हे ठिकाण राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पोलिसांनी हा गुन्हा राजगड पोलीस ठाण्याकडे वर्ग केला. असे असले तरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी या मिसिंगचा तपास सुरु
ठेवण्यास सांगितले होते. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे व नितीन गायकवाड यांनी तांत्रिक विश्लेषण चालू ठेवले होते.




