- November 10, 2025
- No Comment
ज्येष्ठाकडून अल्पवयीन मतिमंद मुलीला आमिष दाखवून विनयभंग

पुणे : मतिमंद मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या ज्येष्ठाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पीडित मुलीच्या आईने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका ७० वर्षीय ज्येष्ठाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दहा वर्षांची असून, ती मतिमंद आहे. आरोपी ज्येष्ठाला मुलीचे कुटुंबीय ओळखतात. तो घराशेजारी राहायला आहे. ७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास मतिमंद मुलगी घरासमोर खेळत होती. त्यावेळी आरोपीने मुलीला आमिष दाखवून घराशेजारी असलेल्या अडगळीच्या जागेत नेले. तेथे त्याने मुलीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर मुलगी घाबरली. तिने या घटनेची महिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणी ज्येष्ठाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मदने तपास करत आहेत.




