• November 12, 2025
  • No Comment

निलेश घायवळच्या प्रकरणाच्या तपासातून मोठा मनी लॉड्रिंगचा प्रकार उघडकीस:आर्थिक व्यवहारांच्या सखोल चौकशीसाठी आता विशेष केंद्रीय संस्थेची मदत घेण्यात येत आहे

निलेश घायवळच्या प्रकरणाच्या तपासातून मोठा मनी लॉड्रिंगचा प्रकार उघडकीस:आर्थिक व्यवहारांच्या सखोल चौकशीसाठी आता विशेष केंद्रीय संस्थेची मदत घेण्यात येत आहे

    पुण्यातील संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या कारवायांवर पुणे पोलिसांची गुन्हे शाखा बारकाईने नजर ठेवून आहे. अशाच एका गंभीर गुन्हेगारी प्रकरणातील मुख्य आरोपीच्या आर्थिक व्यवहारांच्या सखोल चौकशीसाठी आता विशेष केंद्रीय संस्थेची मदत घेण्यात येत आहे. गुन्हेगारीतून कमावलेल्या कोट्यवधींच्या मालमत्तेचा स्त्रोत आणि त्यावर आधारित मनी लॉड्रिंगचे मोठे रॅकेट उघड करणं हा या मागील एकमेव उद्देश आहे. अशातच आता निलेश घायवळला मोठा धक्का बसला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी टोळीप्रमुख नीलेश घायवळ याच्या संशयास्पद आर्थिक उलाढालींचा तपास करण्यासाठी अंमलजावणी संचालनालयाला म्हणजेच ईडीला पत्र पाठवून औपचारिक विनंती केली आहे. घायवळविरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, याच गुन्ह्यांतून त्याने मोठी आणि संशयास्पद संपत्ती जमा केली असावी, असा पोलिसांना दाट संशय आहे.

    पोलिसांच्या नोंदीनुसार, नीलेश घायवळ आणि त्याच्या टोळीवर एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खंडणी, खुनाचा प्रयत्न, गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक करणे, बनावट कागदपत्रे तयार करणे तसेच मालमत्ता बळकावण्यासाठी दुखापत पोहोचवणे अशा अनेक गंभीर आरोपांचा समावेश आहे. तपासादरम्यान पोलिसांना घायवळच्या प्रचंड मोठ्या आर्थिक उलाढालीचे ठोस पुरावे हाती लागले आहेत. या टोळीने धाराशिव, अहिल्यानगर, बीड आणि सातारा यांसारख्या परिसरांमध्ये विंड पॉवर प्रकल्पांशी संबंधित गैरव्यवहार, खंडणी आणि इतर बेकायदेशीर मार्गांनी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवल्याचा पोलिसांना संशय आहे.

    पोलिसांनी या सर्व गुन्ह्यांसंदर्भातील एफआयआर आणि आवश्यक पुरावे ईडीकडे सोपवले आहेत. यामुळे या प्रकरणाच्या तपासातून मोठा मनी लॉड्रिंगचा प्रकार उघडकीस येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या घायवळने बेकायदेशीर मार्गाने पासपोर्ट मिळवल्याचेही समोर आले असून, तो सध्या परदेशात असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *