• November 12, 2025
  • No Comment

पुण्यातील अल्पवयीन मुलांना भाईगिरीचे आकर्षण वाढताना दिसत असून त्याची धक्कादायक आकडेवारी आता समोर

पुण्यातील अल्पवयीन मुलांना भाईगिरीचे आकर्षण वाढताना दिसत असून त्याची धक्कादायक आकडेवारी आता समोर

    पुणे: विद्येचं माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे पुण्यातील गुन्हेगारी जगतात अल्पवयीन मुलांचा वाढता वावर धोकादायक आहे. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरण, अलिकडचे गणेश काळे हत्या प्रकरणात अल्पवयीन मुलांचा समावेश होता. पुण्यातील अल्पवयीन मुलांना भाईगिरीचे आकर्षण वाढताना दिसत असून त्याची धक्कादायक आकडेवारी आता समोर आली आहे.

    पुण्यातील गुन्हेगारी विश्वात अल्पवयीन मुले अडकत चालल्याचे धक्कादायक वास्तव आता समोर आले आहे. शहरातील अल्पवयीन मुलांमध्ये ‘भाईगिरी’ ) आणि ‘डॉनगिरी’ चे आकर्षण वाढले असून, केवळ ‘फेम’ मिळवण्यासाठी ते गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारत आहेत. गुन्हेगारीला ‘प्रतिष्ठा’ मानून या टोळ्या सोशल मीडियावर उघडपणे आपले प्रदर्शन करत आहेत, ज्यामुळे पोलीस आणि समाजशास्त्रज्ञांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

    पुणे पोलिसांच्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यांमधील सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. केवळ पाच वर्षांच्या कालावधीत १४०० गुन्ह्यांमध्ये तब्बल २२४३ अल्पवयीन मुले गुन्हेगार म्हणून नोंदवली गेली आहेत. ही आकडेवारी पुण्यात वाढत चाललेले गँगवॉर आणि दहशत माजवण्याचे धक्कादायक वास्तव दर्शवते.

    दरम्यान, 2021 मध्ये 336, 2022 मध्ये 544, 2023- मध्ये 435, 2024 मध्ये 514, 2025 ॲक्टोबरपर्यंत 232 अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यामध्ये सहभाग आढळून आला आहे. त्यामुळे आता या भाईगिरीकडे वळणाऱ्या मुलांना रोखण्याचे, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे

    Related post

    सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर गुंजाळ यास जिल्हा व सत्र न्यायालय यांच्याकडून अटकपूर्व जामीन मंजूर

    सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर…

    पुणे :- येरवडा परिसरात दहशत माजवुन रात्रीच्या वेळेस बर्थ-डे केक भर चौकात सिंघम गाण्यावर कापला. सदररील बातमी प्रसिध्द झाल्यानंतर पोलीसांची कारवाई…
    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

    पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *