- November 13, 2025
- No Comment
पोलीस असल्याचे भासवून डिजिटल अरेस्ट केल्याचे दाखवून दोघा ज्येष्ठ नागरिकांची २ कोटी ८० लाखांची फसवणुक करणार्या6 आरोपींना अटक

पुणे : तुमच्या पार्सलमध्ये ड्रग्ज सापडले असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकांना ब्ल्यु डार्ट अधिकारी व मुंबई पोलीस असल्याचे भासवून डिजिटल अरेस्ट केल्याचे दाखवून दोघा ज्येष्ठ नागरिकांची २ कोटी ८० लाखांची फसवणुक करणार्या ६ जणांना पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी चार राज्यातून तब्बल ५ हजार किमी प्रवास करुन जेरबंद केले आहे. या दोन गुन्ह्यांपैकी एका गुन्ह्यातील ३० लाख तर दुसर्या गुन्ह्यातील ३४ लाख रुपये परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.
मोहम्मद आमेर अखिल मोहम्मद आरीफ (वय ३५, रा. हैद्राबाद), जिगर जितेश पटेल (वय २३, रा. मुंबई) अजिथ विजयन (वय ३६, रा. तिरुअनंतपुरम, केरळ) यांना अटक केली आहे. आरोपी मोहम्मद आमेर आरीफ याने वापर केलेल्या बँक अकाऊंटवर एकूण ७ कोटी ८६ लाख ५६ हजार ७६५ रुपये इतक्या रक्कमेचे व्यवहार झाले आहे. तसेच त्याचा महाराष्ट्र सायबर येथील ५८ कोटीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पिंपरी चिंचवडमधील एका ज्येष्ठ नागरिकाला १ कोटी आणि दुसर्या ज्येष्ठ नागरिकाला १ कोटी ८० लाख रुपयांना गंडा घातला होता. दोन्ही गुन्ह्याचे स्वरुप एकच असल्याने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या गुन्ह्यांचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे यांना आदेश दिला होता. सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, वैभव पाटील, रोहित डोळस यांचे पथक तयार केले होते. त्या अनुषंगाने आरोपीचे ठावठिकाणाबाबत तांत्रिक तपास करुन संशयित आरोपी हे कर्नाटक, तेलंगणा, मुंबई, केरळ येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तपास पथकाने कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र व केरळ राज्यात ५ हजार किमी प्रवास करुन दोन्ही गुन्ह्यातील ६ आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा उघड केला आहे. चोरट्यांकडील बँक खात्यात शिल्लक असलेले ६४ लाख रुपये पोलिसांनी गोठविले असून त्यापैकी ३० लाख रुपये परत मिळाले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, सागर पोमण, रोहित डोळस, प्रकाश कातकाडे, विद्या पाटील, पोलीस अंमलदार हेमंत खरात, सुभाष पाटील, अभिजित उकिरडे, अतुल लोखंडे, सौरभ घाटे, प्रविण शेळकदे, सचिन घाडगे, मुकुंद वारे, दीपक भोसले, सोपान बोधवड, माधव आरोटे, सुरज शिदे, स्वप्नील कणसे, विशाल निचीत, निलेश देशमुख, संतोष सपकाळ, ज्योती साळे, दीपाली चव्हाण, नम्रता कांबळे यांनी केली आहे़ सरकारी अभियोक्ता अॅड मोहिते यांनी न्यायालयात बाजु मांडून आरोपींची पोलीस कोठडी मिळवुन देण्यात मदत केली आहे.




