• November 15, 2025
  • No Comment

अनैतिक संबंधातून ४६ वर्षीय विवाहित महिलेचा तिच्या प्रियकराकडूण धारदार हत्याराने गळा चिरून निर्घृण खून

अनैतिक संबंधातून ४६ वर्षीय विवाहित महिलेचा तिच्या प्रियकराकडूण धारदार हत्याराने गळा चिरून निर्घृण खून

    पुणे : शिरोली (शिंदेवस्ती), (ता. खेड) येथे एका अनैतिक संबंधातून ४६ वर्षीय विवाहित महिलेचा तिच्या प्रेमीने धारदार हत्याराने गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. खेड पोलिस ठाण्यात या खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

    मृत महिलेचे नाव रूपाली विलास वाडेकर (वय ४६, रा. कल्याण, जि. ठाणे) आहे. ती मूळची ठाणे जिल्ह्यातील असून, गेल्या काही दिवसांपासून ती खेड येथील प्रेमीच्या घरी वास्तव्यास होती. आरोपी ललित दीपक खोल्लम (वय ३७, रा. शिंदेवस्ती शिरोली, ता. खेड) याच्याशी रूपालीचे अनैतिक संबंध होते. दोघांमध्ये सतत वादविवाद होत होते. या रागातून ललितने रूपालीचा गळा चिरून खून केल्याचा प्राथमिक संशय आहे

    रात्री उशिरापर्यंत दोघांमधील भांडणाचे काही आवाज शेजाऱ्यांनी ऐकले होते. चौकशीनंतर सव्वा अकरा वाजता रक्तबंबाळ अवस्थेत रूपालीचा मृतदेह आढळल्यामुळे खेड पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार सुदर्शन माताडे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ललित खोल्लम याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *