- November 15, 2025
- No Comment
नितीन गिलबिले हत्याकांडातील प्रमुख आरोपीला बेड्या घालण्यात पोलिसांना यश

पुणे: नितीन गिलबिले हत्याकांडाच्या तपासाला मोठे यश आले आहे. या धक्कादायक हत्याकांडातील प्रमुख आरोपीला बेड्या घालण्यात पोलिसांना यश आले आहे
पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसा ढवळ्या एका तरुणाची फॉर्च्युनर गाडीत जवळून गोळ्या झाडून निर्घृण हत्या करुन त्याचा मृतादेहावरुन कार नेणाऱ्या धक्कादायक प्रकरणातील प्रमुख आरोपीलाही अखेर अटक करण्यात यश आहे. या फॉर्च्युनरचा गाडीचा आणि त्यातील नितीन गिलबिले याचा मृतदेह रस्त्यात टाकून आरोपी फरार झाल्याचा सीसीटीव्ही व्हायरल झाला होता.
दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये वडमुखवडी परिसरातील अलंकापुरम रोडलगत नितीन गिलबिले यांची फॉर्च्युनर गाडीत जवळून पिस्तूलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हत्या केल्यानंतर आरोपी अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे दोघे घटनास्थळावरून पळून गेले होते. या दोघांचा माग काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी स्वतंत्र पथके तयार केली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली होती.
नितीन गिलबिले हत्याकांडातील फरार झालेला मुख्य आरोपी अमित पठारे याला अटक झाली आहे. याआधी या हत्याकांडातील विक्रांत ठाकूर याला अटक करण्यात यश आले होते. त्यामुळे या सनसनाटी हत्याकांडातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. या आरोपींच्या चौकशीतून या खुनामागील नेमके कारण लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे




