• November 15, 2025
  • No Comment

लोकांना आणि व्यापार्‍यांशी गैरवर्तन करणार्‍या व शिवीगाळ करणार्‍या चार बीट मार्शल यांना तडकाफडकी निलंबित

लोकांना आणि व्यापार्‍यांशी गैरवर्तन करणार्‍या व शिवीगाळ करणार्‍या चार बीट मार्शल यांना तडकाफडकी निलंबित

    पुणे : गुन्हे शाखेतील कॉप्स २४ बीट मार्शल म्हणून नेमणुकीला असलेल्यांनी “आम्ही पोलीस आहे, आमचे कोणी काहीही करु शकत नाही़ आमचेकडे पैसे मागितले तर तुम्हाला हद्दीत धंदा करु देणार नाही,” असे दारुच्या नशेत बोलून लोकांना आणि व्यापार्‍यांशी गैरवर्तन करणार्‍या व शिवीगाळ करणार्‍या चार बीट मार्शल यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे़ पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी हा आदेश दिला आहे.

    पोलीस अंमलदार योगेश सुरेश माळी , मुकेश श्रीधर वाळले , शंकर दत्ता धोत्रे , कैलास शेषा्राव फुपाटे अशी निलंबित केलेल्या पोलीस अंमलदारांची नावे आहेत.

    विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आळंदी रोड पोलीस चौकी येथे ११ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हद्दीतील काही नागरिक व व्यापारी चौकीस आले. त्यांनी कळविले की, विश्रांतवाडी पोलीस ठाणे येथे कर्तव्यास असणारे पोलीस अंमलदार योगेश माळी, मुकेश वाळले, शंकर धोत्रे, कैलास फुपाटे हे दारु पिऊन आले. त्यांनी आम्ही पोलीस आहे, आमचे कोणी काहीही करु शकत नाही, आमचेकडे पैसे मागितले तर तुम्हाला हद्दीत धंदा करुन देणार नाही, असे बोलून नागरिकांशी गैरवर्तन व शिवीगाळ केली आहे.

    त्यानंतर १२ नोव्हेबर रोजी सकाळी १० वाजता हजेरीवर याबाबत विचारणा केली असताना त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिलेले नाही. त्याबाबत पोलीस उपनिरीक्षक अनिल पाडेकर यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दैंनदिनीत नोंद घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या अहवालानुसार पोलिसांनी कर्तव्यावर असताना बेजबाबदार, बेफिकीर व जनमानसांत पोलिसांची प्रतिमा मलिन व नैतिक अध:पतनाचे गैरवर्तन केल्याने पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी त्यांना निलंबित केले आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *