- November 16, 2025
- No Comment
पेट्रोल पंपावरील कामगारावर वार करुन दहशत माजविणार्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना येरवडा पोलिसांनी २४ तासाच्या आत केले जेरबंद

पुणे : रांग मोडून पुढे येऊन मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरायला लावून तेथील कामगारावर वार करुन दहशत माजविणार्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना येरवडा पोलिसांनी २४ तासाच्या आत जेरबंद केले.
कृष्णा प्रभाकर नाईक (वय २५, रा. गांधीनगर, येरवडा) आणि अक्षय ऊर्फ आबा सुदाम जमदाडे (वय २५, रा. गांधीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी येरवडा पोलिसांनी सुचना देऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार अतुल जाधव व मुकुंद कोकणे यांना आरोपी हे कल्याणीनगर येथील नदीपात्रात आल्याची बातमी मिळाली. त्यावरुन श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदिप सुर्वे व त्यांचे सहकारी यांनी त्या ठिकाणी जाऊन पाळत ठेवून संशयितांना ताब्यात घेतले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक विजय ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदिप सुर्वे, हवालदार शिंदे, कोकणे, वाबळे, सोगे, कांबळे, सुतार, जाधव, अडकमोल, गायकवाड यांनी केली आहे.




