- November 22, 2025
- No Comment
बंडु आंदेकर टोळीतील प्रमुख गुंडांची पोलिसांनी त्यांच्या घराच्या परिसरात काढली धिंड
पुणे : बंडु आंदेकर टोळीतील प्रमुख गुंडांची पोलिसांनी त्यांच्या घराच्या परिसरात धिंड काढण्यात आली. आंदेकर टोळीचा दरारा कमी करण्यासाठी पोलिसांनी घरझडतीचे निमित्ताने या गुंडांना परिसरातून फिरविण्यात आले.
कृष्णराज ऊर्फ कृष्णा आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि शिवराज आंदेकर यांची पोलीस कोठडी मिळविण्यात आली. आयुष कोमकर खुन प्रकरणात पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्याकडे देण्यात आला आहे
कृष्णा आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि शिवराज आंदेकर यांच्या घराची झडती घेण्याचे काम तपासासाठी महत्वाचे होते. ते करण्यासाठी या तिघांना पोलिसांनी त्यांची दहशत असलेल्या नाना पेठ, गणेश पेठ परिसरात फिरविले. पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर या तिघांची न्यायालयीन कोठडीत कारागृहात रवानगी करण्यात आली.