- November 22, 2025
- No Comment
पुण्यात जुन्या वादातून चुलत भावाने भावाची निर्घृण हत्या केली, अन् मृतदेह पोत्यात भरून फेकून दिला
पुण्यामध्ये भावानेच भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर समोर आली आहे. चुलत भावाने भावाची हत्या केली. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरला अन् फेकून दिल्याचा प्रकार कात्रज गुजरवाडीमध्ये समोर आला आहे. जुन्या वादातून हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकऱणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून चौकशी सुरू आहे.
येथील गुजर निंबाळकरवाडीत पोत्यामध्ये बांधलेला मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. खून करून पोत्यात बांधून मृतदेह फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांचीही झोप उडाली होती. अजय पंडित असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर अशोक पंडित असं आरोपीचं नाव आहे. आरोपीला पुणे पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथून अटक केली.
अशोक पंडित याने भावाची हत्या करत मृतदेह पोत्यात भरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या गुजरवाडी येथे फेकून दिला होता. मृत पावलेला तरुण आणि आरोपी दोघेही चुलत भाऊ असून झारखंड येथील राहणारे आहेत. अंतर्गत वादातून हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांकडून या प्रकऱणाची कसून चौकशी करण्यात येत आहे