• November 23, 2025
  • No Comment

पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त

पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त

    पुणे : पुणे शहरातील गुन्हेगारी हा सर्वात चिंतेचा विषय सध्या बनली आहे. या गुन्हेगारीमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असून अवैध शस्त्र गुंडांच्या टोळींना पुरवले जात आहेत. त्यामुळे आता पुणे पोलिसांनी थेट बेकायदेशीर शस्त्रसाठा जिथून पुण्यात येतो अशा ठिकाणी जाऊन ती कंपनीच उध्वस्त केली आहे. पुणे पोलिसांनी थेट मध्य प्रदेश मध्ये जाऊन तडाखेबंद कारवाई केली आहे. बेकायदेशीर शस्त्रसाठा पुरवणाऱ्या कंपनीचा अड्डा उध्वस्त केल्याने पुणे पोलिसांचं कौतुक केलं जात आहे.

    पुण्यात वाढत चाललेल्या बेकायदेशीर शस्त्रपुरवठ्यावर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी राज्याच्या सीमेपलीकडे जाऊन मोठी कारवाई केली आहे. मध्य प्रदेशातील दुर्गम भागात कार्यरत असलेल्या अवैध बंदूक तयार करणाऱ्या कारखान्यांचा त्यांनी पर्दाफाश करून संपूर्ण अड्डाच जमीनदोस्त केला

    गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा धार जिल्ह्यातील उमरती गावात सापळा रचत ही गुप्त कारवाई केली. या मोहिमेचं नेतृत्व पुणे शहराचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी करत होते. या पथकात एकूण १०५ हून अधिक अधिकारी व कर्मचारी सहभागी होते. छापा टाकताना पोलिसांना गावात वेगवेगळ्या ठिकाणी चालणारे चार वेगवेगळे कारखाने आढळले, जे सर्व त्वरित उद्ध्वस्त करण्यात आले. कारवाईदरम्यान पोलिसांनी १०० हून अधिक गन बॅरल, ५ मॅगझिन, १४ ग्राइंडिंग मशीन, तयारावस्थेतील दोन पिस्तुलं आणि चार काडतुसे जप्त केली. शिवाय या कारखान्यात काम करणारे ४७ जण जागेवरच ताब्यात घेण्यात आले. ही मंडळी अनेक दिवसांपासून बेकायदेशीर शस्त्रनिर्मितीत गुंतलेली असल्याचा संशय आहे

    पुण्यात मागील काही महिन्यांत अल्पवयीन मुलांपर्यंत पिस्तुले पोहोचत असल्याची प्रकरणं समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची साखळी पुढे नेली. चौकशीत या शस्त्रांचा पुरवठा मध्य प्रदेशातून होत असल्याची निर्णायक माहिती मिळाल्यावर विशेष पथकाची तयारी सुरू झाली. त्यानंतर पुणे पोलिसांनी थेट मध्य प्रदेश गाठत या मोठ्या रॅकेटचा छडा लावला. सध्या पुणे पोलिसांकडून संपूर्ण परिसराची आणि कारखान्यांची तपशीलवार झडती सुरू आहे. शहरात होणारा अवैध शस्त्रपुरवठा पूर्णपणे रोखण्यासाठी ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या धाडसी ऑपरेशनचं सर्वत्र कौतुक होत आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *