- November 23, 2025
- No Comment
कोरेगाव पार्क येथील एका थ्री स्टार हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायएका परदेशी तरुणीसह परराज्यातील २ तरुणींची सुटका आरोपी अटक
पुणे : कोरेगाव पार्क येथील एका थ्री स्टार हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याच्या बातमीवरुन अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने छापा घालून एका परदेशी तरुणीसह परराज्यातील २ तरुणींची सुटका केली एका आरोपीला अटक केली आहे.
आदित्य अनिलकुमार सिंह (वय ३९, रा. साईबाबा मंदिर, जर्मन बेकरीजवळ, कोरेगाव पार्क) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्षाचे पोलीस अंमलदार तुषार भिवरकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, कोरेगाव पार्क येथील द हेवन या थ्री स्टार हॉटेलमध्ये एक जण परदेशी व परराज्यातील तरुणींना वेश्या व्यवसायासाठी आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत आहे. पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ बातमीची पडताळणी करुन बनावट ग्राहक पाठविण्यात आला. खात्री झाल्यावर द हेवन हॉटेलवर अचानक छापा टाकून तरुणी पुरविणार्या आदित्य सिंह याला पकडण्यात आले. हेवन हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या एका परदेशी व २ परराज्यातील तरुणींना ताब्यात घेऊन त्यांना महिलाश्रमात पाठविण्यात आले. आदित्य सिंह आणि त्याच्या एजंट साथीदाराविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशालता खापरे, पोलीस उपनिरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार दत्ताराम जाधव, बबनराव केदार, तुषार भिवरकर, ईश्वर आंधळे, इम्रान नदाफ, अमेय रसाळ, वैशाली खेडेकर, रेश्मा कंक, वैशाली इंगळे, भुजबळ यांनी केली आहे.