• November 29, 2025
  • No Comment

जुन्या वादातून एका तरुणाचा डोक्यात, पाठीत पिस्तुलातून गोळ्या घालून खून

जुन्या वादातून एका तरुणाचा डोक्यात, पाठीत पिस्तुलातून गोळ्या घालून खून

    पुणे:जुन्या वादातून एका तरुणाचा डोक्यात, पाठीत पिस्तुलातून गोळ्या घालून खून केल्याची घटना (दि. २७) घडली आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव केतन शामराव कारले (वय २३, रा. चांदुस, ता. खेड) आहे. या घटनेबाबत त्याची पत्नी कुंकुम केतन कारले यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम संतोष तांबे (रा. आसखेड, ता. खेड) यांचा मयत केतन कारले यांच्याशी जुना वाद होता. दि. २७ रोजी सकाळी साडेपाच वाजता मृत केतन कारले आणि त्यांची पत्नी कुंकुम केतन कारले राजगुरुनगर येथे कोर्टाच्या कामासाठी दुचाकीवर जात होते.

    त्यावेळी ठाकूर पिंपरी (ता. खेड) कोळेकर वस्तीच्या शेजारून शुभम संतोष तांबे आणि त्याचे दोन साथीदारांनी केतन कारले याला रस्त्यावर एकटे आढळल्यावर शुभम तांबे यांनी पिस्तुलने डोक्यात, पायात आणि पाठीवर गोळी झाडून त्याचा खून केला. शुभम संतोष तांबे आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात (त्यांचे नावे आणि पत्ते अजून मिळालेली नाहीत) खेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण करत आहेत.

    Related post

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…
    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *