- November 29, 2025
- No Comment
पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्याची आत्महत्या नैराश्यातून गळफास

पुणे: पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सागर पवार (वय २६, रा. बुलडाणा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, आज सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
सागर पवार हा पुण्यात एकटाच राहत होता. खोलीला आतून लॉक लावलेले असल्याने संशय आल्यावर दरवाजा तोडण्यात आला आणि आत त्याचा मृतदेह आढळून आला. एमपीएससी परीक्षेच्या ताणतणावामुळे किंवा नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. सागरच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले असून ते आल्यानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत.




